News Flash

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

पराय मोहल्ला हाजीन या भागात चकमक

जम्मू काश्मीरमधील बंदीपोरामध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. चकमकीत खात्मा झालेल्या दहशतवाद्याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

बंदीपोरा जिल्ह्यातील पराय मोहल्ला हाजीन या भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. मंगळवारी पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.  या चकमकीत भारताचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, सोमवारी पहाटे सीमारेषेजवळील अखनूरमधील जनरल रिझर्व्ह इंजिनीअरिंग फोर्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. सीमा रेषा ओलांडून आलेले दहशतवादी राज्यात हल्ले करु शकतात असा इशाराच गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अखनूरमध्ये हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. यावरुन ते ज्या मार्गाने भारतात आले त्या मार्गाने परतही गेले असतील असे मत गुप्तचर यंत्रणेतील एका अधिका-याने मांडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:50 am

Web Title: jammu and kashmir 1 terrorist killed during encounter in bandipora district
Next Stories
1 नोटाबंदीमागे सरकारी ‘सूचना’!
2 ट्रम्प हे दांडगाई करणारे गृहस्थ!
3 अखिलेशच मुख्यमंत्री; मुलायम यांचा पवित्रा
Just Now!
X