जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात बटोटे-किश्तवाड महामार्गावर आज घडलेल्या एका भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काहीजण जखमी झाले आहेत. स्थानिक रूग्णालायात जखमींवर उपचार सुरू आहे.
डोडो जिल्ह्यातील खिलैनी येथे मंगळवारी बटोटे-किश्तवाड महामार्गावरून जवळपास दोन हजार फूट खोल दरीत एक प्रवाशांनी भरलेले वाहन कोसळल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृत्यू झालेले नागरिक नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत? त्यांची नावं काय आहेत? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
#UPDATE: The death toll in Doda road accident rises to 16. https://t.co/tCEmwMXzAa
— ANI (@ANI) November 12, 2019
अपघाताची माहिती मिळाताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व पोलिसांना याबाबत कळवले. यानंतर बचावकार्य सुरू झाले होते. या अगोदर जम्म-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडलेल्या एका अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जवळपास २४ जण जखमी झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 5:32 pm