X
X

जम्मू-काश्मीर : भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू

READ IN APP

डोडा जिल्ह्यातील घटना, प्रवासी वाहन दरीत कोसळल्याने अपघात

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात  बटोटे-किश्तवाड  महामार्गावर आज घडलेल्या एका भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काहीजण जखमी झाले आहेत. स्थानिक रूग्णालायात जखमींवर उपचार सुरू आहे.

डोडो जिल्ह्यातील खिलैनी येथे मंगळवारी  बटोटे-किश्तवाड  महामार्गावरून जवळपास दोन हजार फूट खोल दरीत एक प्रवाशांनी भरलेले वाहन कोसळल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  अपघातातील मृत्यू झालेले नागरिक नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत? त्यांची नावं काय आहेत? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अपघाताची माहिती मिळाताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व पोलिसांना याबाबत कळवले. यानंतर बचावकार्य सुरू झाले होते. या अगोदर जम्म-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडलेल्या एका अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जवळपास २४ जण जखमी झाले होते.

21
X