News Flash

भारत-पाकिस्तान सीमेवर दहा दिवसांच्या आत आढळला दुसरा बोगदा

हीरानगर सेक्टरमधील पानसरमध्ये १५० मीटर लांबीचा बोगदा शोधून काढण्यात बीएसएफच्या जवानांना यश

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून, सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.

याबाबत अधिका माहिती देताना लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या विशेष शोधमोहीमेत जम्मूमधीप पानसर येथे आणखी एक बोगदा आढळला आहे. बीपी नंबर १४ व १५ दरम्यान हा बोगदा आढळून आलेला हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब बोगदा; बीएसएफने घुसखोरीचा डाव उधळला

बीएसएफने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता. लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.

या अगोदर देखील बीएसएफला ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात २५ फूट खोल व १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. विशेष म्हणजे, या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 3:18 pm

Web Title: jammu and kashmir a tunnel detected by bsf in pansar area along international border in kathua msr 87
Next Stories
1 तामिळनाडू – राहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले…
2 पाकिस्तानला लस पुरवठयाच्या प्रश्नावर भारताने भूमिका केली स्पष्ट
3 शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; नवा व्हिडीओ आला समोर
Just Now!
X