करोनानं संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. करोनामुळे राज्यांची स्थिती बिकट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी झाल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन नाही, औषधांचा तुटवडा अशा भयानक स्थितीतून देश जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता काही राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी रात्रीचा कर्फ्यू लावला आहे. आता करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये आज रात्री ८ ते २६ एप्रिलच्या सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. ३४ तासांचा हा कर्फ्यू असणार आहे. राज्यपाल कार्यालयातून हा आदेश जारी करण्यात आहे. करोना कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व बंद असणार आहे.

Fact Check : मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर लस घेऊ नये? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य!

“केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये आज रात्री ८ ते २६ एप्रिलच्या सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करोना कर्फ्यू असेल. अत्यावश्यक सेवांना फक्त मंजुरी देण्यात आली आहे. बाजार आणि इतर सेवा बंद असतील”, असं राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करोना लस, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांना आयात शुल्कातून सूट

यापूर्वी जम्मू काश्मीरमधील १० जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला होता. हा कर्फ्यू रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत होता. जम्मू, उधमपूर,कठुआ,श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडात रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला होता.