06 December 2019

News Flash

पाकिस्तानकडून तोफमारा; भारतीय जवान शहीद

पाकिस्तानकडून तीन दिवसांत करण्यात आलेले शस्त्रसंधीचे हे दुसरे उल्लंघन आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ातील नियंत्रण रेषेवर तोफा आणि छोटय़ा शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात लष्करातील एक जवान शहीद झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून तीन दिवसांत करण्यात आलेले शस्त्रसंधीचे हे दुसरे उल्लंघन आहे. सुंदरबनी येथे तैनात असलेला जवान पाकिस्ताच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता, त्याला तातडीने लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला. त्यापूर्वी पाकिस्ताच्या सैनिकांनी पहाटेही हल्ला केला. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

 

First Published on July 23, 2019 6:03 am

Web Title: jammu and kashmir army jawan martyred in pakistan ceasefire violation abn 97
Just Now!
X