सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून बुधवारी दुपारी पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. आर. पी. हाजरा असे या जवानाचे नाव असून ते हेड कॉन्स्टेबलपदावर कार्यरत होते. हाजरा यांचा आज (बुधवारी) वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हाजरा यांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
जम्मू- काश्मीरमधील सीमा रेषेवर सांबा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याच्या गोळीबारात सीमेवर तैनात असलेले बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर पी हाजरा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा, मुलगी असा परिवार आहे. हाजरा यांचा मुलगा १८ वर्षांचा असून मुलगी २१ वर्षांची आहे. ५१ वर्षीय हाजरा हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे निवासी होते.
J&K: BSF Head Constable RP Hazra lost his life in ceasefire violation by Pakistan in Samba Sector. He is survived by his wife, 18-year-old son & 21-year-old daughter. Today is his birthday. pic.twitter.com/T0hjehBX6H
— ANI (@ANI) January 3, 2018
गेल्या वर्षभरात पाकिस्तानने ८०० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून २०१८ च्या सुरुवातीलाही पाकच्या कुरापती सुरुच आहेत. २३ डिसेंबर रोजी केरी सेक्टर येथे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात ३ जवान शहीद झाले होते. यामध्ये भंडाऱ्याचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश होता. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षभरात सैन्याचे १४ जवान, १२ नागरिक आणि बीएसएफच्या ४ जवानांनी जीव गमावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 7:50 pm