20 January 2021

News Flash

त्रालच्या जंगलात चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

त्रालच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्रालच्या जंगलात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. नागबालच्या जंगलामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  ४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत. जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे.

आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

शाह काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार असून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल चर्चा करणार आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांची सुद्धा ते भेट घेतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 9:32 am

Web Title: jammu and kashmir encounter security forces terrorist pulwama tral dmp 82
Next Stories
1 एका रात्रीत चंद्राबाबू नायडूंचा बंगला पाडला, मुख्यमंत्री रेड्डींची कारवाई
2 गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक
3 केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
Just Now!
X