उत्तर काश्मीरमध्ये सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि जैश –ए-मोहोम्मदच्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश झाले.
सुरक्षा दलाच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, सोपोर शहराजवळच्या एका गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी गावात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले. त्यावेळी एका घरातून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.