जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत अखेर सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. दरम्यान परिसरात शोधमोहिम अद्यापही सुरू आहे. दहशतवादी ठार झाल्यानंतर या ठिकाणी जवानांवर दगडफेक करण्यात आल्याचं वृत्त असून या दगडफेकीत सीआरपीएफचे ४ जवान जखमी झाले आहेत. मृत दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. मात्र, चकमकीदरम्यान ८ स्थानीक नागरिक देखील जखमी झाले आहेत.
#UPDATE on Kulgam encounter: Bodies of the 5 terrorists killed, have been recovered; identity yet to be ascertained. Heavy stone pelting is on; 4 CRPF personnel sustained injuries. Search operation continues. #JammuAndKashmir https://t.co/Y9tUAg6Pwu
— ANI (@ANI) February 10, 2019
सुरक्षा दलाला केलम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी केलम गावाला चारही बाजुनी वेढले. त्यानंतर परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. त्याचवेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारताच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पहाटेपासून सुरू असलेल्या या चकमकीत अखेर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2019 12:02 pm