गेल्या दोन दिवसांच्या उघडिपीनंतर बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाऊस पडला. मात्र झेलम नदीची पाण्याची पातळी ओसरत असल्याने पुराचा धोका नाही, असे सूत्रांनी सांगितले.
जोरदार पावसामुळे राज्यात गेल्या सात महिन्यांत दुसऱ्यांदा पूर परिस्थिती उद्भवली आहे. राजधानी श्रीनगरमध्ये बुधवारी दुपारी अडीच पर्यंत ७.२ मिमी. पाऊस झाला. दक्षिण काश्मीरसह कुपवाडा येथेही १२.४ मिमी. पावसाची नोंद झाली. मात्र त्यामुळे पुन्हा पुराचा धोका नाही. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने झेलम नदीतील आणि श्रीनगर शहरातील पाणी बऱ्याच प्रमाणात ओसरले आहे. झेलमची दक्षिण काश्मीरमधील संगम येथील धेक्याची पातळी २१ फुटांवर आहे. बुधवारी त्याच्या बरेच खाली म्हणजे १०.५८ फुटांवरून पाणी वाहत होते.