News Flash

जम्मू- काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

अवंतीपोरा येथील त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अवंतीपोरा येथील त्राल परिसरातील आरमपोरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. परिसरात शोधमोहीम राबवल्यानंतर ऑपरेशन संपल्याचे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले. मृत दहशतवादी झाकीर मुसाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते.

भारताच्या सुरक्षा दलांनी या वर्षभरात २३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या आठवड्यात पुलवामा येथील सिरनू या गावातही सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र, या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले होते आणि या हिंसाचारात सहा तरुणांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 9:42 am

Web Title: jammu and kashmir four terrorists killed security force tral awantipora operation still on
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये जुंपली, आमदार अलका लांबा देणार राजीनामा ?
3 अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा
Just Now!
X