News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. 

हंदवाडामधील क्रालगुंड येथे बुधवारी रात्री सैन्याच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हंदवाडामधील क्रालगुंड येथे बुधवारी रात्री सैन्याच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. गुरुवारी सकाळपर्यंत परिसरात शोधमोहीम राबवली जात होती. पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नसून चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीही हंदवाडा येथे चकमक झाली होती. ७२ तास ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पाच जवानही या चकमकीत शहीद झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 7:44 am

Web Title: jammu and kashmir handwara encounter security forces killed terrorists
Next Stories
1 देशांतर्गत दहशतवादाचा सामना करण्यास भारत सक्षम, कोणाच्या मदतीची गरज नाही : उपराष्ट्रपती
2 राफेलप्रकरणी पीएमओचा गैरवापर; मोदींवर खटला भरण्याची आली वेळ : राहुल गांधी
3 राफेल कागदपत्रे चोरीचा दावा विलंबाने का?
Just Now!
X