जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला असून सुरक्षा दलांनी सोमवारी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे घुसखोरीचा डाव भारताच्या सतर्क जवानांनी उधळून लावला. पाकमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. रविवारपासून आत्तापर्यंत या भागात सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

कुपवाडा येथे रविवारी रात्री देखील सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर पुलावामामध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अदनान याला कंठस्नान घालण्यात यश आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir infiltration bid foiled in kupwara 3 more terrorists killed one security personnel martyred
First published on: 24-09-2018 at 14:58 IST