News Flash

प्रजासत्ताक दिनी सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांना दणका, दोघांना कंठस्नान

या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगरजवळील खोनमोह येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

जम्मू- काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी दहशतवादी आणि सुुरक्षा दलात चकमक झाली असून श्रीनगरजवळील खोनमोह येथे ही चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगरजवळील खोनमोह येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट असून शुक्रवारी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या कॅम्पजवळ ग्रेनेड हल्ला केला. यात पाच जण जखमी झाले.

दरम्यान, गेल्या वर्षभरात जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एकूण 260 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकूण 95 जवान शहीद झाले. यात जम्मू- काश्मीर पोलीस दलातील 45 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 9:01 am

Web Title: jammu and kashmir khonmoh encounter security forces kills 2 terrorist
Next Stories
1 Republic Day: राजपथावर लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन
2 सीरियल किलरला कुंभ मेळयातून अटक, सहा महिन्यात केल्या दहा हत्या
3 ट्रम्प यांची विरोधकांबरोबर डील! तीन आठवडयांसाठी अमेरिकेची शटडाऊनमधून सुटका
Just Now!
X