News Flash

‘एलईटी’चे २ दहशतवादी ठार

चकमकीत एक पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) दोन श्रीनगरस्थित दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीनगरच्या दानमर परिसरातील आलमदार वसाहतीमध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे या परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्यांना शरण येण्यास सांगण्यात आले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले असता चकमक उडाली. या चकमकीत एलईटीचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, इरफान अहमद सोफी आणि बिलाल अहमद भट अशी त्यांची नावे असून ते दोघेही श्रीनगरमधील नातीपोरा परिसरातील रहिवासी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत एक पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:03 am

Web Title: jammu and kashmir lashkar e taiba in the encounter two let terrorists killed akp 94
टॅग : Terrorist
Next Stories
1 जगभरातच तिसऱ्या लाटेचा धोका
2 लसीकरणाने मृत्यूदरात घट;‘आयसीएमआर’चा निष्कर्ष
3 तालिबानच्या हल्ल्यात भारतीय छायाचित्रकाराचा मृत्यू 
Just Now!
X