28 October 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : ‘एनआयए’कडून फुटीरतावाद्यांच्या घरावर छापेमारी

छापेमारीचा निषेध म्हणून फुटीरतावाद्यांकडून दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन

(एनआयएने छापेमारी केल्यानंतरचं परिसरातील छायाचित्र)

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांच्या घरावर छापासत्र सुरू केले आहे. टेरर फंडिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये एनआयएने मंगळवारी(दि.27) काश्मीर खोऱ्यात एकूण सात ठिकाणी छापे मारल्याची माहिती आहे.

यामध्ये फुटीरतावादी नेते यासीन मलिक, शब्बीर शाह, मीरवाइज उमर फारुख, अशरफ खान, मसरत आलम, जफ्फार अकबर आणि नसीम गिलानी यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.


ही कारवाई दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना अर्थसहाय्य करण्याच्या कारणावरून करण्यात आली आहे. यासंबंधीत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली.अनेक मालमत्तांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या पावत्या, बँक खात्यांचे तपशील, विविध दहशतवादी संघटनांचे लेटरहेड आणि पाकिस्तानी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा देण्यासाठी शिफारस पत्र अशी अनेक प्रकारची कागदपत्रे या छाप्यांमध्ये एनआयएच्या हाती लागली आहेत. याव्यतिरिक्त फुटीरतावादी नेता मीरवाइज उमर फारुखच्या घरातून हायस्पीड इंटरनेट कम्युनिकेशन सेटअपदेखील जप्त करण्यात आल्याचीही माहिती आहे. दुसरीकडे, या छापेमारीचा निषेध म्हणून फुटीरतावाद्यांनी दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 9:25 am

Web Title: jammu and kashmir nia raids houses of separatists
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 लष्करी कारवाई करा पण दहशतवाद्यांवर; अमेरिकेने टोचले पाकचे कान
3 अशाप्रकारे तयार करण्यात आला हवाई हल्ल्याचा ‘मास्टरप्लॅन’
Just Now!
X