23 February 2019

News Flash

कुपवाड्यात दहशतवाद्याला कंठस्नान

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कुपवाडा येथे गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दलांतर्फे मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्याच्याकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्धासाठी लागणारे साहित्य सापडले आहे.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसातील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी शोपियाँ जिल्ह्यातील कुंदलन गावात हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते.

First Published on July 12, 2018 12:13 pm

Web Title: jammu and kashmir one terrorist killed during encounter in kupwara