04 March 2021

News Flash

जम्मू-काश्मीर : लष्करी तळाबाहेर संशयास्पद हालचाल, शोधमोहिम सुरू

लष्करी तळावर दहशतवाद्यांकडून ग्रेनड हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.

जम्मू काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात लष्कराच्या नागीशरन कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. 34 राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्वप्रथम लष्करी तळाच्या सतर्क असलेल्या पहारेकऱ्याने संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्यानंतर त्याने तातडीने कारवाई करत हवेत गोळीबार केला आणि याबाबत इतरांना सूचना दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लष्करी तळावर दहशतवाद्यांकडून ग्रेनड हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात लगेचच हाय अलर्ट जारी करण्यात आला असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शोधमोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 9:24 pm

Web Title: jammu and kashmir shopian indian army nagisharan camp shots fired suspicious movement
Next Stories
1 सर्जिकल स्ट्राइकच्या ‘हिरो’ला काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी, ‘टास्क फोर्स’चं करणार नेतृत्व
2 Pulwama Attack: तिने भीक मागून कमावलेले ६ लाख ६१ हजार रुपये दिले शहीदांच्या कुटुंबियांना
3 तुम्ही करता ती खुद्दारी, इतरांनी केली तर गद्दारी? सिद्धूंचा मोदींविरोधात खोचक ट्विट
Just Now!
X