22 September 2020

News Flash

काश्मीरमध्ये दगडफेकीत जखमी झालेला जवान शहीद

गुरुवारी अनंतनागमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ येथून जात असताना काही तरुणांनी ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत राजेंद्र सिंह हा जवान जखमी झाला होता.

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे जमावाने केलेल्या दगडपेकीत जखमी झालेला जवान शुक्रवारी शहीद झाला. राजेंद्र सिंह (वय २२) असे त्या जवानाचे नाव असून तो लष्करात शिपाई पदावर कार्यरत होता.

अनंतनाग येथे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या ताफ्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकात राजेंद्र सिंह याचा समावेश होता. गुरुवारी हा ताफा अनंतनागमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ येथून जात असताना काही तरुणांनी ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत राजेंद्र सिंह हा जवान जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  राजेंद्र सिंह हा मूळचा उत्तराखंडचा असून तो लष्करात शिपाई होता. बोदना गावातील रहिवासी असलेला राजेंद्र सिंह हा २०१६ मध्ये लष्करात भरती झाला होता.

दरम्यान, शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे देखील एक जवान शहीद झाला. या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर एक जवान शहीद झाला. लान्स नायक ब्रजेश कुमार (वय ३२) असे या जवानाचे नाव असून ते २००४ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 5:14 am

Web Title: jammu and kashmir soldier suffers head injury during stone pelting in anantnag dies in hospital
Next Stories
1 मध्यरात्री पुणे पोलिसांचे पथक सुधा भारद्वाज यांच्या निवासस्थानी, सकाळी करणार अटक
2 जनतेचा पैसा घेऊन पळालेल्या घोटाळेबाजांना भारतात परत आणू: राजनाथ सिंह
3 चीनमधील शाळेत चाकूधारी महिलेच्या हल्ल्यात १४ मुले जखमी
Just Now!
X