News Flash

घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला; ४ जवान जखमी

कुपवाड्यातील केरन सेक्टर येथे सीमा रेषेजवळ राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत होते. यादरम्यान तीन ते पाच दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सीमा रेषेजवळ भारतीय लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी गुरुवारी हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून घटनास्थळी अजूनही चकमक सुरु आहे.

कुपवाड्यातील केरन सेक्टर येथे सीमा रेषेजवळ राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत होते. यादरम्यान तीन ते पाच दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार जवान गंभीर जखमी झाले. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असून जखमींना लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या जम्मू- काश्मीर दौऱ्यावर रवाना होत असतानाच ही घटना घडली आहे. राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू- काश्मीर दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 11:45 am

Web Title: jammu and kashmir terrorist attack encounter keran sector kupwara district army men injured
Next Stories
1 पेट्रोल ९ तर डिझेलच्या दरात ७ पैशांची कपात
2 QS rankings 2019 : आयआयटी मुंबई ठरले देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
3 स्वबळावरच लढणार; अमित शाहांच्या ‘मातोश्री’ वारीनंतरही शिवसेना ठाम