जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी लष्करी तळाला लक्ष्य करत गोळीबार केला. यामध्ये अधिक वृत्त समजू शकलेले नाही. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. हा हल्ला शोपियांतील अहगम स्थित ४४ राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर झाला आहे. संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.
Jammu And Kashmir: Terrorists attacked 44 Rashtriya Rifles camp at Ahgam, Shopian today. Security forces retaliated. No loss of life or property reported. Area cordoned, search operation going on.
— ANI (@ANI) January 27, 2019
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी श्रीनगर येथील बाह्य भाग खोनमोह परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यात २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफल आणि मोठ्याप्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला होता. चकमकस्थळी ५० राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्रीनगर पोलिसांनी संयुक्त अभियान चालवण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 7:54 pm