News Flash

Pulwama terrorist attack: पुलवामामध्ये कोर्टाच्या आवारात दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद

Pulwama terrorist attack: पुलवामा जिल्ह्यातील जगलतमंडी येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे हल्ला न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेल्या पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला.

Pulwama terrorist attack: कॉन्स्टेबल गुलाम रसूल आणि कॉन्स्टेबल गुलाम हसन अशी या शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

Pulwama terrorist attack: जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी कोर्टाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला असून या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसराला सैन्य व जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने वेढले असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

पुलवामा जिल्ह्यातील जगलतमंडी येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे हल्ला न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेल्या पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस दलातील दोन जवान शहीद झाले. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील बंदुक घेऊन पळ काढला. यानंतर दहशतवाद्यांना कोर्टाजवळील सरकारी महाविद्यालयाबाहेरील पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

हल्ल्याचे वृत्त समजताच सैन्य, पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी परिसराला वेढले असून सध्या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. परिसरातील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली.  कॉन्स्टेबल गुलाम रसूल आणि कॉन्स्टेबल गुलाम हसन अशी या शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.पुलवामामध्ये कोर्टाच्या आवारात दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:42 am

Web Title: jammu and kashmir terrorists grenade attack court complex pulwama two police personnel martyred
Next Stories
1 तीन वर्षांच्या मुलीला नदीत फेकून लेस्बियन कपलची आत्महत्या
2 कोका कोलाचा मालक पूर्वी सरबत विकायचा: राहुल गांधी
3 काँग्रेसही आता बूथ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार!
Just Now!
X