02 December 2020

News Flash

सैन्य दिनी ‘जैश’ला दणका; उरीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता

(संग्रहित छायाचित्र )

देशभरात सैन्य दिन साजरा होत असतानाच सीमा रेषेवर सतर्क जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे चारही दहशतवादी ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे.

जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी सोमवारी सकाळी ट्विटरद्वारे उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती दिली. जम्मू- काश्मीर पोलीस, सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. हे चौघेही ‘जैश- ए- मोहम्मद’ संघटनेचे सदस्य होते. या चौघांकडून शस्त्रसाठा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या आधारे हे चौघे ‘जैश’चे दहशतवादी होते आणि दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता हे स्पष्ट झाले, अशी माहिती बारामुल्लामधील पोलीस अधीक्षक इप्तियाज हुसैन यांनी दिली. दुलंजा येथे दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे सतर्क जवानांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने परिसरात संयुक्त मोहीम राबवली.  चकमकीत चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

दरम्यान, भारतीय जवानांनी २०१७ मध्ये पाकिस्तानच्या १३८ जवानांना ठार केले. भारतीय लष्कराचे एकूण २८ जवान सीमावर्ती भागातील गोळीबारात शहीद झाले. गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या एकूण ८६० घटना घडल्या आहेत. तर २०१६ मध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाच्या २२१ घटना झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 10:15 am

Web Title: jammu and kashmir three jem terrorists killed in dulanja uri while infiltrating joint operation police army
Next Stories
1 लव्ह जिहाद नव्हे तर अनैतिक संबंध लपवण्यासाठी मजुराला जिवंत जाळले
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रावण’ तर राहुल गांधी ‘राम’; अमेठीत वादग्रस्त पोस्टर
3 आणखी एक निर्भया: १५ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या
Just Now!
X