26 February 2021

News Flash

जम्मू-काश्मीर – एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जखमी

घुसखोरींचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला

संग्रहीत

जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे.

लष्करी सुत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणं सोपं जाव यासाठी, एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कारचे चार जवान जखमी झाले.

यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला. सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या दिशेने पडलेले आहेत व ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. २०२१ मध्ये पाकिस्तानकडून केलं गेलेलं हे पहिलं मोठं शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:31 pm

Web Title: jammu and kashmir three militants killed four injured in loc msr 87
Next Stories
1 “आम्ही आदेश देणार नाही,” शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याची केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
2 ‘बेपत्ता’ जॅक मा यांच्यासंदर्भातील मोठी बातमी; चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ
3 येडियुरप्पांची डोकेदुखी वाढणार! भाजपाचे १५ आमदार बंडाच्या पावित्र्यात
Just Now!
X