27 February 2021

News Flash

भाजपा नेत्याच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

बिलाल अहमद हे भाजपा नेते अन्वर खान यांचे खासगी सुरक्षा रक्षक आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भाजपा नेत्याच्या सुरक्षा रक्षकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा रक्षकाकडील बंदूक खेचून पळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

गुरुवारी पुलवामा जिल्ह्यातील बलहामा येथे बिलाल अहमद यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. त्यांच्याकडील बंदूक घेऊन पळ काढण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. मात्र बिलाल अहमद यांनी प्रतिकार केल्याने दहशतवाद्यांनी पळ काढला. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. एका घरात हे तिन्ही दहशतवादी लपून बसले होते. शुक्रवारी सकाळी तीन पैकी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बिलाल अहमद जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिलाल अहमद हे भाजपा नेते अन्वर खान यांचे सुरक्षा रक्षक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 9:11 am

Web Title: jammu and kashmir two militants killed after they tried to snatch service rifle from security guard of bjp leader
Next Stories
1 ‘बुआ-भतिजा’ देणार धक्का, २०१९मध्ये उत्तर प्रदेशात ५० जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता
2 काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या बळावरच शांती शक्य
3 डोनाल्ड ट्रम्प यांची सुन आणि मुलगा विभक्त होणार, वेनेसा ट्रम्पचा घटस्फोटासाठी अर्ज
Just Now!
X