25 November 2020

News Flash

जम्मू-कश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

परिसरात अद्यापही चकमक सुरू

संग्रहीत

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये आज(मंगळवार) सकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर, या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू आहे.

जवानांनी दहशतवादी दडून बसलेल्या परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. शोपियांमधील कुटपोरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कराच्या 34आरआर आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त टीमने शोधमोहीम सुरू केली होती.

जवानांची चाहूल लागतच परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला होता. याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दहशतवाद्यांना अगोदर आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर त्यांचा खात्मा करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 1:46 pm

Web Title: jammu and kashmir two terrorists killed in shopian msr 87
Next Stories
1 NDA जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? भाजपा म्हणते…
2 Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”
3 बिहारमध्ये जेडीयूला मागे टाकून भाजपा मोठा भाऊ बनण्याच्या मार्गावर
Just Now!
X