20 January 2018

News Flash

जम्मू-काश्मीर: दहशतवादी-पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात तीन जवान शहीद

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

नवी दिल्ली | Updated: August 13, 2017 8:16 AM

भारतीय सैन्यदलाचे जवान (Source: Express Photo by Shuaib Masoodi)

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद तर एका कॅप्टनसमवेत तीन अन्य जखमी झाले आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली. तर दुसरीकडे पुंछ सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी संध्याकाळी नाहक गोळीबार केला. यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला. या गोळीबारात एक महिलाही ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनापोरा येथील अवनिरा गावात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन जखमी जवानांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुळचे मध्य प्रदेशचे असलेले सुभेदर जगरामसिंह तोमर (वय ४२) हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याकडून पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमावर्ती गावे आणि भारतीय चौकीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, बांदीपोरा येथे पोलिसांच्या शोधपथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात शनिवारी सकाळीही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मेंढार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. रकिया बी असं या महिलेचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचा मारा केला तेव्हा रकिया घरात होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रकियाचा जागीच मृत्यू झाला.

First Published on August 13, 2017 8:12 am

Web Title: jammu kashmir 3 jawan martyr in terrorist and pakistans attack few injured
  1. A
    anand
    Aug 13, 2017 at 8:36 am
    अतिशय वाईट घटना. पण हे संबंधित अधिकार्याना कळत नाही का? सुरक्षितता नाही का? अशा दहशतवादी हल्ल्यात किती जवान जाणार आहेत?
    Reply