01 March 2021

News Flash

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियनमध्ये सोमवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सोमवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी या तिन्ही दहशतवादयांचा खात्मा केला. शोपियन जिल्ह्यातील वाची भागामध्ये ही चकमक झाली. दहशतवादी एका घरामध्ये लपले होते.

सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला सांगितले, तेव्हा त्यांनी गोळीबार सुरु केला. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली. एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, त्याचे नाव अदिल शेख आहे.

पीडीपीचे माजी आमदार एजाज मीर यांच्या जवाहर नगरमधील घरातून आठ शस्त्रे लुटल्याचा त्याच्यावर आरोप होता. २९ सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने ही चोरी केली होती. वासीम वानी असे दुसऱ्या मृत दहशतवाद्याचे नाव आहे. तो शोपियनचाच राहणार होता. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सुरक्षा दलांना या मृत दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रे सापडली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:02 pm

Web Title: jammu kashmir 3 terrorists killed by security forces dmp 82
Next Stories
1 …आणि नरेंद्र मोदींनी काढली अनिल कुंबळेच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीची आठवण
2 भाजपा खासदाराने थेट सरदार पटेलांशी केली अमित शाहांची तुलना
3 Pariksha Pe Charcha 2020 with PM Modi: त्या रात्री मोदींच्या मनात नेमकं काय सुरु होतं?
Just Now!
X