News Flash

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द

भाविकांसाठी आरतीचं थेट प्रक्षेपण करण्याचा प्रशासनाचा निर्णय

सध्या देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी २१ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान ही यात्रा सुरू राहणार होती. याचदरम्यान, शुक्रवारी अमरनाथ यात्रेसाठी प्रथम पूजा आयोजित करण्यात आली होती. अशातच अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतो.

यापूर्वी एप्रिल महिन्यात अमरनाथजी श्राईन बोर्डानं पवित्र गुफेची यात्र रद्द करणार असल्याचं म्हटलं होती. यासंदर्भात पत्रकही जारी करण्यात आलं होतं. परंतु काही वेळानंचं जम्मू काश्मीर माहिती संचालनालयानं यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. देशाच्या तसंच जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाते. परंतु यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नोंदणी प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली नव्हती. २००० साली अमनाथजी श्राईन बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाचे अध्यक्ष जम्मू काश्मीरचे राज्यपाल किंवा उपराज्यपाल असतात.

थेट प्रक्षेपण करणार

यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविकांसाठी बोर्डानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पाडले जाणार असल्याचं जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

गेल्यावर्षीही अमरनाथ यात्रा मध्यातूनच स्थगित
गेल्यावर्षीही मध्यातच अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. जेव्हा यात्रा स्थगित केली त्यावेळी तब्बल साडेतीन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. दरवर्षी देशातच नाही जगातूनही अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 8:17 pm

Web Title: jammu kashmir amarnath yatra cancelled this year due to coronavirus pandemic jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना विषाणू म्हणजे देवानं आपल्या पापांची दिलेली शिक्षा : शफीकुर्रहमान बर्क
2 उद्यापासून कर्नाटकात लॉकडाउन नाही, लोकांनी कामावर जायला हवं ! मुख्यमंत्री येडियुरप्पांची घोषणा
3 महाराष्ट्र, तामिळनाडूमधून आलेल्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ – येडियुरप्पा
Just Now!
X