भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानची मोठया प्रमाणावर आगपाखड सुरु आहे. भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. त्यामुळे काश्मीर मुद्द्यावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अखेर टि्वट करुन आपली हताशा व्यक्त केली आहे.

संचारबंदी हटवल्यानंतर आवाज दडपण्यात आलेल्या काश्मीरमध्ये काय घडते त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काश्मिरी जनतेविरोधात मोठया प्रमाणावर लष्करी बळाचा वापर करुन स्वातंत्र्य चळवळ रोखता येईल असे भाजपा सरकारला वाटते का? या चळवळीला अजून चालना मिळेल इम्रान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय समुदाय हे पाहत राहणार कि, हे रोखण्याची नैतिक हिम्मत दाखवणार ? असा सवाल इम्रान यांनी आपल्या टि्वटमध्ये विचारला आहे.