News Flash

UN मध्ये जम्मू-काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात चीन-पाकिस्तान अपयशी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीर मुद्यावरुन चीन आणि पाकिस्तान अपयशी ठरले आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीर मुद्यावरुन चीन आणि पाकिस्तान अपयशी ठरले आहेत. संयुक्त राष्ट्रात भारताची कोंडी करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न होता. पण त्यांना अन्य देशांचा पाठिंबा मिळाला नाही. सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी काश्मीर मुद्यावरुन औपचारीक बैठक घेण्याची पाकिस्तानची मागणी आधीच फेटाळून लावली होती.

बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीरच्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा चीन आणि पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चीनने मागणी केल्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. सुरक्षा परिषदेतील देशांसमोर चीनने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यामुळे त्या प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अन्य देशांची साथ मिळू शकली नाही.

रशियाने भारताला पाठिंबा दिला. रशियाने काश्मीरप्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचे समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली हा एकप्रकारे आमचा विजय असल्याचा दावा केला. बैठक संपल्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सईद अकबरुद्दिन यांनी कलम ३७० हटवणे हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. काश्मीरमधील स्थिती सुरळीत आणि शांत व्हावी हीच आमची इच्छा आहे. काश्मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर आम्ही ठाम आहोत. मात्र काही देश जिहादचा वापर करीत भारतात रक्तपाताला वाव देत आहेत. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दहशतवाद थांबवा, मगच आम्ही चर्चेला तयार आहोत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इम्रान आणि ट्रम्प यांची चर्चा :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. काश्मीर प्रश्नावरून एकमेकांच्या संपर्कात राहण्यावरही या चर्चेत एकमत झाले, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी सांगितले. सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी खान यांनी समितीच्या चार स्थायी सदस्य देशांशी चर्चा केल्याचा दावाही कुरेशी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 8:30 am

Web Title: jammu kashmir article 370 un pak and china fail dmp 82
Next Stories
1 दहशतवाद थांबवा, तरच चर्चा!
2 जम्मू-काश्मीरमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल
3 काश्मीरमधील निर्बंधांबाबत तूर्त हस्तक्षेप नाही
Just Now!
X