04 March 2021

News Flash

घुसखोरीच्या प्रयत्नात तीन अतिरेकी ठार

पाकिस्तानकडून गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.

| June 7, 2015 04:19 am

पाकिस्तानकडून गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. आताच्या तिसऱ्या प्रयत्नात कूपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यात तीन दहशतवादी ठार झाले.
पहाटेच्या वेळी कूपवाडा जिल्ह्य़ातील तोमार गली भागात लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसली. घुसखोरांनी सीमा पार करून ते आत आले असता जवानांनी त्यांना आव्हान दिले. त्या वेळी धुमश्चक्रीत तीन दहशतवादी मारले गेले, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.
घुसखोरीचा दोन आठवडय़ांतील हा तिसरा प्रसंग होता. तीन सैनिक व एक दहशतवादी २५ मे रोजी तंगधर येथील चकमकीत ठार झाले होते तर त्या आधीच्या चकमकीत त्याच भागात चार दहशतवादी व एक नागरिक ठार झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 4:19 am

Web Title: jammu kashmir ceasefire violation 3 militants killed
टॅग : Jammu Kashmir
Next Stories
1 ‘भाजप-पीडीपीत समन्वयाचा अभाव’
2 गोव्यात बलात्काराच्या ‘किरकोळ घटना’ घडणारच!
3 ‘देशात महिलांच्या सहमतीनेच बलात्कार होतात’
Just Now!
X