जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शनिवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून राजौरी आणि पूंछमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन नागरीक जखमी झाले आहेत. यासंबंधीचे वृत्त एएनआयने दिले आहे. पाकिस्तानकडून अद्याप गोळीबार सुरू आहे.