News Flash

काश्मीरवरून भारताने चीनला फटकारले

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या पाश्र्चभूमीवर गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले.

(संग्रहित छायाचित्र)

देशांतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला

जम्मू-काश्मीरची पुनर्रचना हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून, चीनने त्यात हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत भारताने  गुरुवारी चीनला फटकारले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या पाश्र्चभूमीवर गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताने देशांतर्गत कायदा आणि प्रशासकीय विभागात एकतर्फी बदल करून चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचे गेंग शुआंग यांनी म्हटले होते.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीर या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांद्वारे पुनर्रचना करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नांत भारत हस्तक्षेप करत नाही. त्याचप्रमाणे चीनसह इतर देशांनी आमच्या प्रश्नांत हस्तक्षेप करू नये, असे रवीशकुमार म्हणाले. चीन-पाकिस्तान कथित सीमा करार १९६३ नुसार चीनने पाकव्याप्त काश्मीरमधल्या भारतीय क्षेत्रावर बेकायदा ताबा मिळवला आहे. तसेच कथित चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्पाबाबतही या दोन्ही देशांकडे आपले म्हणणे मांडण्यात आले आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.सीमावादाबाबत  शांततापूर्ण मार्गाने चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे उभय देशांनी आधीच मान्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 4:01 am

Web Title: jammu kashmir china india akp 94
Next Stories
1 कॉग्निझंटच्या १३ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार
2 अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय मोदींकडून सरदार पटेल यांना समर्पित
3 पाकिस्तानकडून व्हिएन्ना करारातील अटींचे उल्लंघन
Just Now!
X