News Flash

सलाम ! तरुणीला वाचवण्यासाठी CRPF जवानांनी नदीत घेतली उडी

जवानांनी जिवाची पर्वा न करता तरुणीचा जीव वाचवला आहे

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन आयुष्यातही जवान इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे जवानांनी जिवाची पर्वा न करता तरुणीचा जीव वाचवला आहे. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथे तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांसाठी सोमवारचा दिवस देखील नेहमीप्रमाणेच होता. पण अचानक समोर आलेल्या परिस्थितीत जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि नदीत बुडणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला.

सीआरपीएफ जवानांचा तरुणीला वाचवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जवान तरुणीला वाचवण्यासाठी नदीकाठावर दगडांवर धावताना दिसत आहेत. तरुणी पाण्यात वाहून जात असताना आरडाओरडा ऐकताच सर्व जवान तिच्या दिशेने धाव घेतात. यावेळी दोन जवान नदीत उडी घेत तरुणीला पकडण्याचा प्रयत्न करतात.

यावेळी नदीकिनारी असणारे इतर जवान मानवी साखळी तयार करतात आणि जवानांना तरुणीला घेऊन सुरक्षित बाहेर येण्यासाठी मदत करतात. हे सर्व जवान सीआरपीएफच्या १७६ बटालियनचे असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 5:17 pm

Web Title: jammu kashmir crpf men jump into river to rescue woman sgy 87
Next Stories
1 रोहित शेखरची पत्नी तुरुंगात शिकतेय टॅरो कार्ड रिडींग
2 गुजरात : भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू
3 तीन वर्षांपुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीच्या नावे खंडणीचा फोन, पोलीसही हैराण
Just Now!
X