News Flash

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई

तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर लष्कराची शोध मोहीम सुरूच आहे. (छायाचित्र।एएनआय)

जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मागील ४८ तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत १० दहशतवादी ठार झाले.

जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. शनिवारी दुपारी शोपियातील हाडीपोरात लष्कराने शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी दहशतवादी जवानांमध्ये चकमक सुरू झाली. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत गोळीबार होता. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले.

दहशतवादी संघटनेत नव्यानं दाखल झालेल्या तरुणाचं मतपरिवर्तन करून शरण येण्याचं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर तरुणाच्या वडिलांनीही त्याला शरण येण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शरण येण्यापासून रोखलं, असं काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे.

ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीनंतर सुरक्षा जवानांची परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.

लष्करांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या ४८ तासांत १० दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दक्षिण काश्मिरमध्ये तब्बल चार ठिकाणी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी उडाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 9:36 am

Web Title: jammu kashmir encounter broke out three terrorists killed by the security forces bmh 90
Next Stories
1 देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला -केंद्रीय आरोग्यमंत्री
2 पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
3 ब्रिटनमधील करोनासंसर्गात ६० टक्के घट
Just Now!
X