News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

दारगाड सुगन परिसरात ही चकमक सुरु आहे

संग्रहित छायाचित्र

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून दोन दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी दारगाड सुगन परिसरात ही चकमक सुरु झाली होती. अद्यापही चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरलं असून दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून ऑपरेशन सुरु केलं आहे.

याआधी गुरुवारी बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील डांगरपोरा येथे चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. यावेळी काही दहशतवादी अडकले होते. तसंच बुधवारी सुरक्षा दलांकडून शोपियान जिल्ह्यातील पिंजूरा गावात सुरु असलेल्या मोहिमेविरोधात हिंसा भडकली होती. यामध्ये निदर्शन करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 7:41 am

Web Title: jammu kashmir indian army terrorist shopian district dragad sugan area fire exchange
Next Stories
1 मोदी मंत्रिमंडळात शहा, जयशंकर
2 Narendra Modi Ministry 2.0 : नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री
3 राजीव कुमार यांना १० जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण
Just Now!
X