दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून दोन दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी दारगाड सुगन परिसरात ही चकमक सुरु झाली होती. अद्यापही चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरलं असून दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून ऑपरेशन सुरु केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी गुरुवारी बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील डांगरपोरा येथे चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. यावेळी काही दहशतवादी अडकले होते. तसंच बुधवारी सुरक्षा दलांकडून शोपियान जिल्ह्यातील पिंजूरा गावात सुरु असलेल्या मोहिमेविरोधात हिंसा भडकली होती. यामध्ये निदर्शन करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir indian army terrorist shopian district dragad sugan area fire exchange
First published on: 31-05-2019 at 07:41 IST