News Flash

पाकिस्तानकडून भारतीय चौकीवर गोळीबार, प्रत्युत्तरात पाकचा एक जवान ठार

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

त्याचवेळी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी पिटाळून लावले होते. छायाचित्र: पीटीआय

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीर येथील हिरानगर सेक्टरमधील बोबिया या बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) चौकीवर गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला तर बीएसएफच्या गोळीबारात एक पाकिस्तानी जवान ठार झाला. पाकिस्तानने गुरूवारीही याच चौकीवर हल्ला केला होता. त्याचवेळी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी पिटाळून लावले होते. या सहा दहशतवाद्यांनी बीएसएफच्या चौकीवर हल्ला केला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला होता.
दरम्यान, उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट करण्याबरोबरच सुमारे ३९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानने मात्र भारताने सर्जिकल स्ट्राईक केले नसून त्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचा दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:47 pm

Web Title: jammu kashmir one bsf jawan injured in firing by pakistan at bobiya post in hiranagar sector
Next Stories
1 केसाचा प्रवास ‘तिरुपती बालाजी मंदिर ते लंडन’!
2 Varun Gandhi: वरुण गांधी हनी ट्रॅपमध्ये फसले ?, गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप
3 विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता
Just Now!
X