News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला केला. 

चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले. दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. मृत्यू झालेला दहशतवादी हा जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला केला.  या हल्ल्याला सैन्याच्या पथकानेही चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर घटनास्थळी चकमक सुरु झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले. दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 8:32 am

Web Title: jammu kashmir one unidentified terrorist killed security forces encounter at sopore
Next Stories
1 कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी
2 शरद पवार-मोहिते संघर्षांला अखेर तोंड फुटले..
3 बापट यांच्या घोषणेमुळे आमदारांची परीक्षा
Just Now!
X