जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.
काश्मीरमधील शोपियाँ येथे तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इमारतीत आणखी एक दहशतवादी असून त्याचा देखील खात्मा करण्यात आल्याचे समजते. मात्र, या वृत्ताबाबत सैन्याकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
शोपियाँ जिल्ह्यातील इमाम साहब गावात ही चकमक झाली. दहशतवादी गावातील एका तीन मजली घरात लपून बसले होते. मृत्यू झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2019 11:37 am