02 March 2021

News Flash

Coronavirus : वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती

पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवाही स्थगित करण्यात आली आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवीच्या यात्रेला आजपासून स्थगिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरमधून येणाऱ्या तसंच त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बस देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी मंगळवारी वैष्णोदेवी धाम येथे असलेली गुंफा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुसरीकडे श्रीनगर एनआयटीनंतर मंगळवारी जम्मूतील आयआयटी आणि आयआयम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे. मुबारक मंडी डोगरा आर्ट-म्युझियम आणि श्रीनगर एसपीएस म्युझियम ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी हॉटेल्सदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनंतनाग, बारामुल्लासारख्या ठिकाणी हॉटेल्स, जिम, शाळा, पार्क पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी सर्व शिक्षण संस्था, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कारगिलमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं असून बार असोसिएशननंही २५ मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:47 pm

Web Title: jammu kashmir vaishnodevi yatra has been closed from today coronavirus jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : लोकसंख्या १.३ अब्ज, चाचणीसाठी भारतात फक्त ५२ प्रयोगशाळा
2 मुख्यमंत्रीपदासाठी शिवराजसिंह चौहान यांची तडफड पाहून कीव येते : कमलनाथ
3 Coronavirus : GoAir च्या कर्मचाऱ्यांना अनपेड लिव्हवर जाण्याचे आदेश
Just Now!
X