News Flash

सीमेजवळ BSF ने पाडलं पाकिस्तानचं सशस्त्र ड्रोन

कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात पहाटे टेहाळणी करताना आढळले

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या जवानांनी आज पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पाकिस्तानचे एक ड्रोन पाडले. बीएसएफच्या एका पथकाने कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात हे ड्रोन उडताना पाहिले होते.

विशेष म्हणजे, बीएसएफच्या जवानांनी आज जे पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडले त्यामध्ये एक अमेरिकन बनावटीची एम-4 रायफल व ६० काडतूसं तसेच दोन मॅगजिन, सात एम67 ग्रेनेड देखील ही शस्त्र देखील आढळली आले आहेत. त्यामुळे एकीकडे गलवान सेक्टरमध्ये चीनकडून कुरपतींना सुरूवात झाली असताना, दुसरीकडे पाकिस्तान देखील विविध मार्गांनी घुसखोरीचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. हे आज बीएसएफच्य जवानांनी हाणून पाडलेल्या पाकिस्तानी ड्रोनवरून पुन्हा एकदा उघड झालं आहे.

कठुआ पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन हिरानगर सेक्टरमधील रथुआ परिसरात भारतीय हद्दीत पहाटे उडत असल्याचे आढळले होते. यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला हाणून पाडले. यासंदर्भात बीएसएफकडून देखील माहिती दिल्या जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी रेंजर्स आणि सैन्याकडून अशा घुसखोरी व टेहाळणी करणाऱ्या ड्रोनचा वापर, भारतीय जवानांच्या हालचालीवंर लक्ष ठेवण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी केला जात असून, याचाच वापर दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासाठी देखील केला जात आहे. हिरानगर सेक्टर नेहमीच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा परिसर ठरलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 12:13 pm

Web Title: jammu kashmir weapons recovered from the pakistani drone shot down by bsf msr 87
Next Stories
1 आतापर्यंत शहरांना झळाळी दिली, आता गावांसाठी काम करा; पंतप्रधान मोदी यांचं स्थलांतरित मजुरांना आवाहन
2 मोदीजी, चीनला उत्तर द्यावंच लागेल : जितेंद्र आव्हाड
3 VIDEO: …तर भारताचा नवीन पूलही आला असता चिनी तोफखान्याच्या रेंजमध्ये
Just Now!
X