जम्मूमध्ये गुरुवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांचे खापर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुरक्षा आस्थापनांवर फोडले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी झालेल्या या हल्ल्याबाबतची सविस्तर माहिती देणारा अहवाल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अमेरिकेत पाठविला आहे. न्यूयॉर्कमध्ये डॉ. सिंग यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा होणार असून त्या वेळी डॉ. सिंग हा गंभीर मुद्दा उपस्थित करण्याची अपेक्षा आहे.
जम्मूत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी सुरक्षा रक्षकांनी प्रचलित पद्धतीचा अवलंब न केल्याबद्दल अब्दुल्ला यांनी सुरक्षा आस्थापनांवर टीकास्त्र सोडले आहे.  या  कालावधीत कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा जाब अब्दुल्ला यांनी विचारला.