जनाधिकार पार्टीचे प्रमुख पप्पू यादव यांनी जेसीबीवर चढून चायनीज मोबाईलच्या बॅनरला काळ फासलं. भारत आणि चीन सैन्यातल्या लडाखमध्ये झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले. ज्यानंतर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याचाच प्रत्यय बिहारमधल्या पाटण्यातही आला. पाटणा येथे जनाधिकार पार्टीचे प्रमुख पप्पू यादव यांनी ओप्पो कंपनीच्या मोबाइलची जाहिरात असलेल्या बॅनरला काळं फासलं. जेसीबीच्या मदतीने ते बॅनरपर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांनी या बॅनरला काळं फासलं

या घटनेसंदर्भातला व्हिडीओ एएनआयने पोस्ट केला आहे. चीनने लडाखमध्ये ज्या कुरापती काढल्या त्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र त्या चकमकीत २० जवान शहीद झाले. या घटनेबाबत देशभरात तीव्र संताप व्यक्त होतो आहे. त्या संतापातूनच मेड इन चायना वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होते आहे. या मागणीला अनुसरुनच भारतात विविध प्रकारे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातो आहे. अशात पाटणा या ठिकाणी पप्पू यादव ओप्पो या मोबाइलची जाहिरात असलेल्या बॅनरला काळं फासलं. यासंदर्भातला व्हिडीओ एएनआयने पोस्ट केला आहे.