News Flash

जनलोकपाल विधेयकावरून दिल्लीतील ‘आप’चे सरकार पडणार?

आम आदमी पक्षाच्या जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.

| February 5, 2014 11:42 am

आम आदमी पक्षाच्या जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सार्वजनिकपणे घेतले जाईल, यावर आपचे नेते ठाम असल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. या पेचातून मार्ग निघाला नाही, तर पाच आठवड्यांचे हे सरकार पडण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे अधिवेशन सार्वजनिकपणे घेऊन त्यामध्येच हे विधेयक मंजूर करून घेण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली सरकारच्या या विधेयकाला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. पण, अशा मंजुरीची काहीही गरच नसल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांना वाटते. हाच मुद्दा कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये वादग्रस्त बनला आहे.
दिल्ली कॉंग्रेसचे प्रमुख आणि आमदार अरविंदर सिंग लव्हली म्हणाले, जे विधेयकच मुळा घटनात्मक नाही, त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिल्ली विधानसभेत सादर करण्यात येणाऱया अर्थविषयक परिणामांचा समावेश असलेल्या विधेयकांना केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी असणे आवश्यक असते. त्याशिवाय या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ शकत नाही. जे विधेयकच मुळात घटनात्मक नाही, त्याला कॉंग्रेस पाठिंबा देऊ शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 11:42 am

Web Title: jan lokpal bill divides aap and congress threatens delhi government
Next Stories
1 लैंगिक छळाप्रकरणी राजस्थानात सनदी अधिका-याचे निलंबन
2 अण्णांच्या सुचनांचा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश
3 काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी नवाज शरीफांकडून भारताला निमंत्रण
Just Now!
X