‘आम आदमी’चा जाहीरनामा
दिल्लीत येत्या ८ डिसेंबर रोजी होणाऱया मतदानानंतर सत्तेत आल्यास रामलीला मैदानावर सर्वांच्या समक्ष जनलोकपाल विधेयक संमत करू असे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आज बुधवार प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
त्याचबरोबर आम आदमीचे सरकार अशोक खेमका आणि दुर्गा शक्ती नागपाल यांसारख्या निष्ठावंत सरकारी अधिकाऱयांना पुन्हा रूजू करू असेही यात म्हटले आहे.
आम आदमीच्या जाहीरनाम्यातील मुद्दे-
* दिल्लीत जनलोकपाल विधेयक लागू करणार
* किरकोळ बाजारपेठेत थेट विदेशी गुंतवणूकीला परवानगी दिली जाणार नाही
* दिल्लीतील सध्याच्या सर्व प्रशासकीय कामांमध्ये महत्वपूर्ण बदल केले जातील
* लहान-लहान मोहल्ला सभा घेऊन सरकार चालविले जाईल. यानुसार तेथील विकासाची कामे, शाळा, जन्म आणि मृत्यूचे दाखले तसेच परिसरातील मद्याची दुकाने यासर्व गोष्टींवर योग्य नियंत्रण ठेवले जाईल. या मोहल्ला सभांमुळे प्रत्येक गोष्टीकडे जवळून लक्ष दिले जाईल व कामे योग्यरित्या हाताळली जातील.