News Flash

‘जनता कर्फ्यू’ला वर्ष झालं : मीम्स आणि व्हिडीओचा सोशल मीडियावर पाऊस

'जनता कर्फ्यू'नंतर पुढे काय झालं होतं?

जनता कर्फ्यूला २२ मार्च रोजी वर्ष पूर्ण झालं.

एक विषाणू… त्याबद्दलच्या प्रचंड अफवा… जीवघेणी भीती! करोनानं भारतात पाऊल ठेवलं त्यावेळी अशी प्रत्येकाचीच मनस्थिती होती. बघता बघता इतर देशाप्रमाणे करोनानं भारतात पाऊल ठेवलं. संथ गतीने आलेल्या करोनानं मात्र महिनाभरातच देशात हाहाकार उडवला. वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय. २२ मार्च २०२०!

सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याच आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. ‘’…आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं, ये है जनता कर्फ्यू… यानी जनता के लिए… जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू…’’असं मोदी म्हणाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. या वर्षपूर्तीनिमित्ताने सोशल मीडियावर जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे. त्याचबरोबर मीम्स आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 9:48 am

Web Title: janta curfew one year complete corona virus pm narendra modi speech lockdown bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! १८ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या मदतीने केली बापाची हत्या
2 मदत म्हणून जास्त धान्य हवं होतं तर जास्त मुलं जन्माला घालायला हवी होती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
3 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा उत्तराखंडला इशारा; दररोज १० ते १२ भाविक पॉझिटिव्ह
Just Now!
X