27 September 2020

News Flash

अण्णा हजारे यांची आजपासून ‘जनतंत्र यात्रा’

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे जनक, समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘जनतंत्र यात्रा’ उद्या, रविवार ३१ मार्चपासून येथे सुरू होत आहे. अण्णा हजारे हे राज्याच्या आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात

| March 31, 2013 04:08 am

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे जनक, समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘जनतंत्र यात्रा’ उद्या, रविवार ३१ मार्चपासून येथे सुरू होत आहे. अण्णा हजारे हे राज्याच्या आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात एकूण आठ सार्वजनिक सभा घेणार आहेत. त्यांची पहिली सभा रविवारी येथे होणार आहे.
जनतंत्र मोर्चाचे सदस्य आय. एस. भल्ला या संदर्भात बोलताना म्हणाले की, अण्णा आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात राज्यात एकूण आठ सार्वजनिक सभा घेतील. उद्या, रविवारी अण्णा आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात अमृतसर येथील दुर्गियाना मंदिर, हरमंदिर साहेब आणि रामतीर्थ मंदिराला भेट देतील व त्यानंतर जालियानवाला बाग येथे त्यांची सभा होईल. यानंतर कपूरथाळा आणि जालंधर येथे रविवारी त्यांच्या अन्य दोन सभा होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 4:08 am

Web Title: jantranta yatra from today by anna hazare
Next Stories
1 ‘जेलो’ला आयपीएलमध्ये नो नो!
2 मुलायमसिंग यांच्याकडून अल्पसंख्याकांची फसवणूक
3 अमेरिकेच्या शिष्टमंडळाची मोदीभेट वादाच्या भोवऱ्यात?
Just Now!
X